-
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) सध्या तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
मराठी मनोरंजन विश्वातील या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतेच साडीमध्ये एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऋतुजाने गडद तपकिरी रंगाची पारंपरिक इरकल साडी नेसली आहे.
-
या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी ऋतुजाने त्यावर मॅचिंग ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
-
विशेष म्हणजे, ऋतुजाने नेसलेली ही साडी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर आणि सुरुची अडारकर यांच्या ‘थ्रेड अँड ठुमका’ (Thread & Thumka) या लोकप्रिय ब्रँडची आहे.
-
ऋतुजा ही केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर ती एक यशस्वी उद्योजिकाही आहे.
-
अभिनया सांभाळत ऋतुजाने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकलं असून, मुंबईतील अंधेरी येथे तिचे ‘फूडचं पाऊल’ नावाचे स्वतःचे हॉटेल आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा बागवे/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा