-
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या ‘नो बीन्स नो’ या तेलगू वेब सीरिजमुळे खूपच चर्चेत आली आहे.
-
मिथिलाने फक्त मराठीच नाही, तर हिंदीमध्येही तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि आता ती तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे.
-
श्रीजा राजगोपाल या फॅशन स्टायलिस्टने मिथिलाचे साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मिथिलाने सोनेरी रंगाची साडी नेसली असून, ही साडी पूर्णपणे प्लेन म्हणजेच कोणतीही डिझाईन नसलेली आहे.
-
या लूकमध्ये तिच्या ब्लाऊजने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, तिने साडीवर सोनेरी रंगाचा डीपनेक आणि छोट्या फुलांची नक्षी असलेला ब्लाऊज घातला आहे.
-
तिने गळ्यात छोटासा नेकलेस आणि हातात कडे, अशी अगदी साधी ज्वेलरी घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
कपाळावर छोटीशी टिकली, हलकासा मेकअप आणि मोकळे सोडलेले कुरळे केस यांमुळे मिथिला खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली असून, सोशल मीडियावर तिचे साडीतील हे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रीजा राजगोपाल/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा