-
प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2 Movie) हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
-
महाराष्ट्रातील बळीराजा (शेतकरी) आणि श्री स्वामी समर्थ यांची भक्ती यांवर आधारित असलेल्या या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
-
या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.
-
या ऐतिहासिक यशानिमित्त चित्रपटाच्या टीमने खास सेलिब्रेशन केले असून, अभिनेत्री संस्कृती बालगुडेने या सेलिब्रेशनचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
संस्कृती म्हणाली, “१०० कोटी हा आकडा ऐकायलाही नवीन आणि अशक्य वाटतोय… निदान आत्तापर्यंत तरी तसंच वाटत होतं! पण स्वामी समर्थांची अथांग कृपा आणि मायबाप प्रेक्षकांचे निस्वार्थी प्रेम, यांमुळे ‘अशक्य ही शक्य’ होऊ शकते, याचा हा चित्रपट जिवंत पुरावा आहे!”
-
पुढे कृतज्ञता व्यक्त करत ती म्हणाली, “या दर्जेदार चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग होता आले, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि कृतज्ञतेची भावना आहे.”
-
“प्रेक्षकांचे मनापासून आभार! ‘देऊळ बंद २’चा हा सुवर्णक्षण मी आयुष्यभर जपेन. १०० कोटी… आणि त्याही पलीकडे, प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा प्रवास अविस्मरणीय आहे!”
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा