-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तारिणी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेतील वेगवेगळ्या धाडसी दृश्यांमुळे ही मालिका सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.
-
या मालिकेत ‘तारिणी’ची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
शिवानी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि ती तिचे फोटो व आठवणी चाहत्यांसोबत शेअर करीत राहते.
-
मालिकेत सतत साडीत दिसणाऱ्या शिवानीने नुकतेच आपले काही स्टायलिश फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने लाल रंगाचा हॉल्टर नेक टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली असून, तिचा हा नवा अंदाज अतिशय मोहक भासत आहे.
-
या ग्लॅमरस लूकवर तिने कानात सुंदर ऑक्सिडाइज्ड झुमके घातले आहेत, जे तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
-
आपले हे फोटो शेअर करताना शिवानीने त्याला ‘Her’ (ती) अशी कॅप्शन दिली आहे.
-
‘तारिणी’ मालिकेतील तिची सहकलाकार अभिज्ञा भावे हिनेदेखील या फोटोंवर ‘Best best bestesttt’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा