-
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुप्रतीक्षित गुप्तहेरपट ‘अल्फा’ (Alpha) उद्या, ३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी, आलियाची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राझदान (Soni Razdan) यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत खास पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये त्यांच्या कुटुंबातील तब्बल चार पिढ्यांच्या महिला एकाच फोटोमध्ये एकत्र पाहायला मिळत आहेत.
-
या सुंदर फोटोत स्वतः सोनी राझदान, त्यांची ९७ वर्षांची आई (आलियाची आजी), त्यांची बहीण, आलिया भट्ट आणि आलियाची चिमुरडी मुलगी राहा एकत्र दिसत आहेत.
-
हा कौटुंबिक फोटो शेअर करत सोनी राझदान यांनी आपल्या आईचे तोंडभरून कौतुक केले आहे.
-
सोनी राझदान यांनी आलियाला तिच्या आगामी चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत.
-
शिव रवैल दिग्दर्शित ‘अल्फा’ हा वायआरएफ (YRF) स्पाय युनिव्हर्समधील महिला मुख्य भूमिका असलेला पहिलाच चित्रपट ठरणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा