-
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ (Taarini TV Serial) मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका आघाडीवर आहे.
-
या मालिकेत दर आठवड्याला येणारी नवी वळणं प्रेक्षकांना स्क्रीनला खिळवून ठेवत आहेत.
-
या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ‘कौशिकी खांडेकर’ ही लक्षवेधी भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच अभिज्ञाने एका हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अभिज्ञाने लाल रंगाचा टॉप आणि स्टायलिश स्ट्राइप्स स्कर्ट परिधान केला आहे.
-
या फोटोंना अभिज्ञाने, ‘Don’t Care About Two Things… सोलवा साल And मुंडा कमाल’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
-
डोळ्यांवर गॉगल आणि चेहऱ्यावरचा स्वॅग दाखवत अभिज्ञाने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक भन्नाट पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा