-
अभिनेत्री श्रेया बुगडेने चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर हक्काचे राज्य केले आहे.
-
श्रेयाने नुकतेच १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले असून, तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रेयाने पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला असून, ती अत्यंत सुंदर पारंपरिक अंदाजात दिसत आहे.
-
या भक्तिमय देवदर्शनादरम्यान श्रेयासोबत तिचा पती निखिल हादेखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
श्रेयाने मंदिराच्या गाभाऱ्यातील काही खास फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये महादेवाच्या पवित्र पिंडीला विविध फुलांनी अतिशय मनमोहक पद्धतीने सजवल्याचे दिसत आहे.
-
या सुंदर फोटोंना तिने ‘हर हर महादेव’, अशी कॅप्शन दिली असून, तिचे हे फोटो सध्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रेया बुगडे /इन्स्टाग्राम)
महात्मा गांधींचा अवमान ? पुतळा काळ्या कापडाने झाकल्याने देशभर संतप्त पडसाद; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष