-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांचा विवाह सोहळा २४ जून रोजी संभाजीनगरमध्ये अतिशय शाही थाटात पार पडला.
-
लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर या नवविवाहित जोडप्याने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात अतिशय आनंदाने केली आहे.
-
विवाहबंधनात अडकल्यानंतर अनुष्का आणि निखिलने थेट जेजुरी गाठून कुलदैवत खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतले.
-
या देवदर्शनाचे काही सुंदर आणि खास फोटो निखिलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांशी शेअर केले आहेत.
-
यावेळी अनुष्काने सुंदर राखाडी रंगाची साडी नेसली असून, निखिलने पारंपरिक शेरवानी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
दोघांनीही कपाळाला मुंडावळ्या बांधून अतिशय पारंपरिक आणि साध्या पद्धतीने खंडेरायाचरणी आपली हजेरी लावली.
-
निखिल आणि अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोंना ‘जय मल्हार’, अशी सुंदर आणि भक्तिमय कॅप्शन दिली आहे.
-
सोशल मीडियावर सध्या या जोडीच्या देवदर्शनाचे फोटो तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: निखिल चव्हाण/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा