-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन घराघरांत लोकप्रिय झाली. वैयक्तिक आयुष्यात डिसेंबर २०२३ मध्ये मुग्धाने प्रथमेश लघाटेशी लग्न केलं.
-
मुग्धाचं सासर रत्नागिरीमध्ये आरवली गावात आहे.
-
गणेशोत्सव, होळीच्या सणाला आणि व्यग्र शेड्यूलमधून वेळ मिळाल्यावर मुग्धा आवर्जून सासरी कोकणात जाते. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने सासरच्या घराची झलक सर्वांना दाखवली आहे.
-
निसर्गरम्य परिसर, सर्वत्र हिरवीगार झाडं, शेणाने सारवलेली जमीन, खळ्यात ( अंगणात ) झाडाला बांधलेला सुंदर झोपाळा, कौलारू घर या सगळ्याची झलक मुग्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय.
-
कोकणात खास ओल्या काजूगरांची भाजी बनवली जाते. याचाही फोटो मुग्धाने शेअर केला आहे.
-
मुग्धा व प्रथमेश यांच्या गावच्या घरी दर गुरुवारी न चुकता गुरुमाऊलींची भजनसेवा केली जाते.
-
कोकणातील सौंदर्य, एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र येऊन सणवार साजरं करणं याची झलक गायिकेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय.
-
मुग्धा लिहिते, “Vitamin : Kokan….कोकणात राहायला मिळणं याहून मोठं भाग्य ते काय असेल…जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली”
-
दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेशच्या फोटोंवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. ( सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे इन्स्टाग्राम )
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…