-
अमृता देशमुख (Amruta Deshmukh) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी आहे.
-
आपल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे आणि मनमोकळ्या स्वभावामुळे अमृताने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अमृताने नुकतेच तिची आई वैशाली देशमुख (Vaishali Deshmukh) यांच्याबरोबर एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने राखाडी रंगाची, तर आई वैशाली यांनी गडद मरून रंगाची पारंपरिक पैठणी साडी नेसली आहे.
-
दोघींनीही या पैठणी साडीवर अतिशय आकर्षक आणि वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज मॅच केले आहेत.
-
या पारंपरिक लूकला पूर्ण करण्यासाठी वैशाली यांनी पारंपरिक दागिने परिधान केलेआहेत, तर अमृताने कानात मोठे झुमके परिधान केले आहेत.
-
अमृताच्या या फोटोशूटवर तिचा पती प्रसाद जवादेने ‘Rajmata With My Queen’ अशी गोड कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…