-
सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तू अनोळखी तरी सोबती’ (Tu Anolakhi Tari Sobati TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) ‘अर्पिता’ सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
योगिताने नुकतेच एक स्टायलिश फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी योगिताने निळ्या रंगाचा टॉप आणि डार्क ब्राऊन रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.
-
अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि ऐश्वर्या शेटे यांनीही योगिताच्या या फोटोंवर कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या योगिताने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही आपला वेगळा ठसा उमटवला होता.
-
त्यानंतर आता तिच्या या नव्या स्टायलिश लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…