-
ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) या मराठी मनोरंजनसृष्टीतील कमालीच्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
-
नुकतेच तितीक्षाने ऐश्वर्याबरोबरचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ऐश्वर्या यांनी मोरपंखी रंगाची चेक्स इरकल साडी नेसली आहे, तर तितीक्षा तपकिरी रंगाच्या इरकल साडीत खुलून दिसत आहे.
-
तितीक्षाने या फोटोंना ‘Bonding Over Candids’ असे कॅप्शन दिले आहे.
-
ऐश्वर्या आणि तितीक्षाने झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केले होते.
-
केवळ अभिनयच नाही, तर ऐश्वर्या आणि तितीक्षाचा अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर (Suruchi Adarkar) साड्यांचा स्वतःचा व्यवसायही आहे.
-
विशेष म्हणजे, या तिघींच्या घट्ट मैत्रीचे रूपांतर आता एका यशस्वी व्यवसायात झाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…