-
अभिनेत्री शर्वरी वाघने (Sharvari Wagh) आपल्या दर्जेदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
नुकताच तिचा बहुप्रतिक्षित ‘ऐल्फा’ (Alpha) हा चित्रपट ३ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, या चित्रपटातील काही खास फोटो शर्वरीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘यश राज फिल्म्स’च्या (YRF) अत्यंत लोकप्रिय ‘स्पाय युनिव्हर्स’चा भाग असलेला हा चित्रपट एका तरुणीच्या थरारक प्रवासावर आधारित आहे.
-
या चित्रपटात शर्वरीबरोबरच बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट, बॉबी देओल आणि अनिल कपूर हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत.
-
आलिया आणि शर्वरी या दोन्ही अभिनेत्री चित्रपटात ‘सुपर एजंट’च्या भूमिकेत देशासाठी लढताना दिसत आहेत.
-
या चित्रपटातील आव्हानात्मक भूमिकेसाठी शर्वरीने प्रचंड शारीरिक मेहनत घेतली असून, तिचे जबरदस्त ॲक्शन सीन्स आणि स्टंट्स सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
-
दरम्यान, कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचे तर, शर्वरी ही महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…