-
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुप्रतीक्षित ‘अल्फा’ (Alpha Movie) हा चित्रपट ३ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
-
याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया नुकतीच पुण्यात आली होती. यावेळी तिचे एक खास मराठमोळे रूप पाहायला मिळाले.
-
आलियाने पुण्यातील ‘एसएनबीपी’ (SNBP) युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये हजारो तरुणांच्या उपस्थितीमध्ये ‘अल्फा’चे दणक्यात प्रमोशन केले.
-
यावेळी आलियाने उपस्थित पुणेकर चाहत्यांना संवाद साधताना, “तुम्ही मला पुण्यात काय खायला घालणार?” असा मजेशीर प्रश्न विचारला.
-
त्यावर तरुणाईकडून एकापेक्षा एक पुणेरी आणि महाराष्ट्रीय पदार्थांची नावे समोर आली.
-
यावर उत्तर देताना आलियाने तिला पुरणपोळी आणि पिठलं-भाकरी प्रचंड आवडत असल्याचा खुलासा केला. तसेच, पुण्यात आल्यावर ‘चितळ्यांची बाकरवडी’ खाण्याची आपली तीव्र इच्छा असल्याचेही तिने आवर्जून सांगितले.
-
‘यश राज फिल्म्स’च्या (YRF) अत्यंत लोकप्रिय ‘स्पाय युनिव्हर्स’चा भाग असलेल्या या चित्रपटात आलिया एका अत्यंत प्रशिक्षित आणि धोकादायक गुप्तहेरच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…