-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुना येती घरा’ (Suna Yeti Ghara TV Serial) या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री दीपा चौधरी (Deepa Chaudhari) ‘उमावती’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
उमावती स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि मायाळू असून, आई आणि पत्नीची कर्तव्ये ती चोख पार पाडते.
-
नुकताच दीपाने या मालिकेच्या सेटवर पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.
-
सध्या मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.
-
या फोटोंमध्ये दीपाने जांभळ्या रंगाची गढवाल साडी नेसली असून, हातात छत्री घेऊन ती पोझ देताना दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करत दीपाने कॅप्शन दिले आहे, “आजचं शेड्युल पावसाने लिहिलं होतं, मी फक्त ते जगत होते. काम लवकर आटोपलं…”
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपा चौधरी/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…