-
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या सशक्त अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री गिरिजा ओक ही तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
-
नुकतेच गिरिजाने सोशल मीडियावर साडीतील काही फोटो शेअर केले असून, तिच्या या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची, पिवळ्या-नारिंगी फ्लोरल प्रिंट असलेली सुंदर साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर तिने मॅचिंग गडद पिवळ्या रंगाचा फुल स्लीव्हज डिझायनर ब्लाऊज परिधान करून, आपला लूक पूर्ण केला आहे.
-
तिने या लूकवर लांब आकर्षक कर्णफुले आणि हातामध्ये साधी नाजूक बांगडी घातली आहे.
-
मोकळे सोडलेले केस आणि अगदी हलका, नॅचरल मेकअप तिच्या या पारंपरिक रूपाला आणखीनच खुलवत आहे.
-
एका फोटोमध्ये ती नक्षीदार बाकावर बसून, एका बाजूला पाहत अत्यंत शांत आणि मनमोहक पोज देताना दिसत आहे.
-
तिच्या या साध्या तरीही रॉयल लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत तिच्या फोटोंवर “My National crush” आणि “मराठी क्रश” अशा कमेंट केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: गिरिजा ओक/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…