-
बॉलीवूडचे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते आमिर खान आपल्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या चर्चेत आले आहेत.
-
विश्वसनीय वृत्तानुसार, आज ५ जुलै रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या पद्धतीने आणि केवळ कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरी स्प्रॅट यांच्याशी विवाहसोहळा होणार आहे.
-
आमिर खान यांनी नेहमीच आपले वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर ठेवण्यास पसंती दिली आहे.
-
आमिर खान यांचा पहिला विवाह १९८६ मध्ये रीना दत्ता यांच्याशी झाला होता, जेव्हा आमिर चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होते. (Express Archive Photo)
-
सुरुवातीला दोन्ही कुटुंबांचा या विवाहाला विरोध होता; परंतु त्यांनी प्रेमविवाह केला आणि या १६ वर्षांच्या वैवाहिक प्रवासात त्यांना जुनैद व इरा ही दोन मुले झाली.
-
परस्पर संमतीने २००२ मध्ये रीना यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतरही आमिर खान आजतागायत त्यांच्याशी आणि मुलांशी अत्यंत जिव्हाळ्याचे व सौहार्दपूर्ण संबंध ठेवून आहेत. (Express Archive Photo)
-
त्यानंतर चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या किरण राव यांच्याशी आमिर खान यांची ओळख झाली आणि डिसेंबर २००५ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा विवाह केला. (Express Archive Photo)
-
या दाम्पत्याला सरोगसीच्या माध्यमातून आझाद नावाचा मुलगा झाला; मात्र १५ वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये त्यांनी एकमेकांपासून सुसंस्कृतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (Express Archive Photo)
-
किरण राव यांच्याशी काडीमोड झाल्यानंतर आमिर खान यांच्या आयुष्यात गौरी स्प्रॅट यांचे आगमन झाले असून, आज ५ जुलै रोजी मोजक्या नातेवाइकांच्या साक्षीने ते आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.
“पुरीसाहेब एखाद्या लहान मुलासारखे ढसाढसा रडत होते”, स्वाती चिटणीस यांनी सांगितली अमरीश पुरी यांची आठवण