-
बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मुलगी अंशुला कपूर (Anshula Kapoor) आज (६ जुलै) तिचा प्रियकर रोहन ठक्करबरोबर (Rohan Thakkar) लग्नबंधनात अडकणार आहे.
-
लग्नापूर्वीच्या विधींचे आणि सोहळ्यांचे काही सुंदर फोटो अंशुलाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रविवारी अंशुलाचा मेहंदी आणि चुडा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
-
यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र येऊन या आनंदाच्या क्षणांचा आनंद घेताना दिसले.
-
शेअर केलेल्या एका फोटोमध्ये, अंशुला भाऊ अर्जुन कपूरला मिठी मारून भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
भावाला मिठी मारताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते, हा क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
या ग्रँड कौटुंबिक सोहळ्याला जान्हवी कपूर, खुशी कपूर, बोनी कपूर यांच्यासह करिश्मा कपूर, नीतू कपूर आणि वरुण धवन यांसारख्या बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
दरम्यान, अंशुलाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिची लग्नघाई यशस्वी करण्यासाठी दोन्ही बहिणी म्हणजेच जान्हवी आणि खुशी कपूर यांचे मनापासून आभार मानले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंशुला कपूर/इन्स्टाग्राम)
Video: गौरव मोरेच्या नव्या घरी पोहोचले जॉनी लिव्हर; गौरवची ‘ती’ कृती पाहून नेटकरी म्हणाले, “जिंकलंस भावा”