-
लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकरची (Mithila Palkar) मुख्य भूमिका असलेली ‘सुपर सुब्बू’ (Super Subbu) ही कॉमेडी-ड्रामा सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.
-
विशेष म्हणजे, ही नेटफ्लिक्सची पहिली तेलुगू ओरिजिनल सीरिज असून, ती हिंदीसह इतर भाषांमध्येही डब करण्यात आली आहे.
-
या सीरिजच्या यशानंतर मिथिलाने सोशल मीडियावर तिचे साडीतील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी मिथिलाने पेस्टल रंगाची फ्लोरल प्रिंट साडी नेसली आहे, ज्यामध्ये तिचा लूक अत्यंत खुलून दिसतोय.
-
‘सुपर सुब्बू’ या सीरिजमध्ये मिथिलाने ‘स्वाती’ नावाच्या एका महत्त्वाकांक्षी अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.
-
मिथिलाच्या या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून पसंती मिळत असून, तिच्या स्क्रीन प्रेझन्समुळे कथेला एक वेगळीच ऊर्जा आणि विनोद मिळाला आहे.
-
नेहमीप्रमाणेच आपल्या क्युट आणि नॅचरल अभिनयाने मिथिलाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)
MPSC परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांचे १३ सवाल; स्पष्टीकरणाची मागणी आणि आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली ही गोड बातमी