-
बालकलाकार मायरा वायकुळ (Myra Vaikul) मुख्य भूमिकेत असलेला ‘मर्दिनी’ (Mardini Movie) हा नवा मराठी चित्रपट नुकताच ३ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
-
अजय मयेकर दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय.
-
स्वतःच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या एका आईचा संघर्ष ‘मर्दिनी’ या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
-
आजच्या काळातील वास्तववादी घटनांवर आधारित असलेली कथा आणि त्याची मांडणी हे या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
-
या चित्रपटात मायराबरोबरच अभिनेत्री प्रार्थना बेहरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
विशेष म्हणजे, अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
-
दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मायराने परिधान केलेल्या सुंदर लाल रंगाच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
या लूकमध्ये मायरा कमालीची क्यूट दिसत असून, तिच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
Video: गौरव मोरेच्या नव्या घरी पोहोचले जॉनी लिव्हर; गौरवची ‘ती’ कृती पाहून नेटकरी म्हणाले, “जिंकलंस भावा”