-
प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची कन्या आणि अभिनेता अर्जुन कपूरची सख्खी बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) काल (६ जुलै) विवाहबंधनात अडकली.
-
अंशुलाने मुंबईत अत्यंत थाटामाटात तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्करबरोबर (Rohan Thakkar) लग्नगाठ बांधली.
-
मुंबईतील प्रसिद्ध ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
हा सोहळा अतिशय खाजगी ठेवण्यात आला होता. त्यामुळे लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवारानेच हजेरी लावली होती.
-
लग्नात अंशुलाच्या केशरी रंगाच्या भरजरी लेहेंग्याने आणि रोहनच्या पांढऱ्या रंगाच्या नक्षीदार शेरवानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
अंशुलाच्या या खास दिवशी तिची भावंडे अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी लग्नातील सर्व विधी आनंदाने पार पाडले.
-
विशेषतः जान्हवी आणि खुशीने अंशुलाच्या ‘मेहंदी’ आणि ‘चुडा’ समारंभाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली होती.
-
दरम्यान, या विवाहसोहळ्यानंतर आता लवकरच चित्रपट क्षेत्रातील कलाकारांसाठी एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंशुला कपूर/इन्स्टाग्राम)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”