-
प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची कन्या आणि अभिनेता अर्जुन कपूरची सख्खी बहीण अंशुला कपूरचा रोहन ठक्करबरोबर ६ जुलै रोजी शाही विवाह सोहळा पार पडला.
-
या विवाहसोहळ्यात नववधू अंशुला कपूरने परिधान केलेल्या गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या भरजरी लेहेंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
बहिणीच्या लग्नात करवली बनलेल्या अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्या ग्लॅमरस लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
जान्हवी कपूरने या खास सोहळ्यासाठी पांढऱ्या आणि हलक्या गुलाबी रंगाच्या फुलांची नक्षी (फ्लोरल वर्क) असलेला आकर्षक लेहेंगा परिधान केला होता.
-
गळ्यात सुंदर चोकर आणि हातात नक्षीदार क्लच बॅग घेतलेल्या जान्हवीच्या पारंपरिक अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.
-
खुशी कपूरने फिकट हिरव्या (पेस्टल ग्रीन) रंगाचा नेटचा आणि एम्ब्रॉयडरी असलेला सुंदर लेहेंगा नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
खुशीने गळ्यात मॅचिंग हेवी ज्वेलरी घातली होती आणि तिच्या हातातील नाजूक फ्लोरल डिझाईनची एम्ब्रॉयडरी बॅग तिच्या लूकची शोभा वाढवत होती.
-
लग्नातील विधीदरम्यान जान्हवी आणि खुशी या दोन्ही बहिणी अंशुलाच्या मागे उभ्या राहून करवल्यांची भूमिका चोख बजावताना दिसल्या.
-
अभिनेता अर्जुन कपूरने देखील आपल्या लाडक्या बहिणींसोबत मजेशीर आणि क्युट पोझ देत या लग्नसोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.
-
(सर्व फोटो सौजन्य: खुशी कपूर/इन्स्टाग्राम)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”