-
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) लवकरच आई होणार आहे.
-
लग्नानंतर दोन वर्षांनी स्वरदाच्या घरात ही गोड बातमी आल्याने सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
नुकताच स्वरदाचा ‘चोर ओटी’चा कार्यक्रम पार पडला असून, याचे खास क्षण तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
सामान्यतः गरोदरपणाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात ‘चोर ओटी’ भरण्याची परंपरा आहे.
-
होणारी माता आणि गर्भाच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी हा कौटुंबिक सोहळा केला जातो.
-
या पारंपरिक कार्यक्रमासाठी स्वरदाने गुलाबी रंगाची सुंदर सिल्क साडी परिधान केली होती, ज्यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
काही दिवसांपूर्वीच स्वरदाने समुद्रकिनाऱ्यावर केलेले तिचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
-
स्वरदाने मार्च २०२४ मध्ये सिद्धार्थ राऊतसोबत लग्नगाठ बांधली होती. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहते आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”