-
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) त्याची मैत्रीण गौरी स्प्रेतबरोबर (Gauri Spratt) ५ जुलै २०२६ रोजी अत्यंत साधेपणाने लग्नगाठ बांधली.
-
आमिर खानचे हे तिसरे लग्न असून, मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडला.
-
कोणतीही भव्य किंवा ग्लॅमरस पार्टी न करता, आमिर आणि गौरीने ‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’ अंतर्गत रजिस्टर लग्न करण्यास प्राधान्य दिले.
-
या सोहळ्याला केवळ दोन्ही कुटुंबांतील सदस्य आणि काही मोजकेच जवळचे मित्र उपस्थित होते.
-
या लग्नाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या दोघांच्याही आधीच्या लग्नांची मुले या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाली होती.
-
आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताची मुले जुनैद खान व इरा खान, दुसरी पत्नी किरण रावचा मुलगा आझाद, आणि गौरी स्प्रॅटचा ७ वर्षांचा मुलगा क्विन, हे सर्वजण या कौटुंबिक सोहळ्यात एकत्र दिसले.
-
या विवाहसोहळ्यातील काही फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी गौरीचा मुलगा क्विन याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
-
लग्नासारख्या गंभीर प्रसंगी त्याने गुलाबी रंगाची क्रीडा जर्सी परिधान केल्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
-
४७ वर्षांची गौरी स्प्रॅट ही बंगळुरू येथील एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी स्प्रेत/इन्स्टाग्राम)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”