-
मयुरी वाघ (Mayuri Wagh) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
झी मराठीवरील ‘अस्मिता’ (Asmita TV Serial) या मालिकेतील डिटेक्टिव्हच्या भूमिकेमुळे मयुरी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
-
आजही अनेक प्रेक्षक मयुरीला ‘अस्मिता’ याच नावाने ओळखतात.
-
मयुरीने नाटक, मालिका आणि रिअॅलिटी शो अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
मयुरीने नुकतेच एक नवीन फोटोशूट केले असून या फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोशूटसाठी मयुरीने काळ्या रंगाचा व्ही-नेक टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी मयुरीने कानातले, अंगठ्या आणि गळ्यात एक नाजूक नेकलेस असा सुंदर साज केला आहे.
-
आपले हे फोटो शेअर करताना मयुरीने एक खास कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहिलं, “प्रकाश आणि शांततेच्या कुशीत, मला माझं एक असं रूप सापडलं जे नेहमी लक्षात राहील.”
-
(सर्व फोटो सौजन्य : मयुरी वाघ/इन्स्टाग्राम)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”