-
झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ (Sanai Chaughade TV Serial) ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेतील लालबाग-परळमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा प्रेक्षकांच्या मनाला चांगलीच भावली आहे.
-
या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी साळवी (Chinmayee Salvi) मुख्य भूमिका साकारत असून, तिच्या ‘शर्वरी परब’ या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
कथानकातील शर्वरी ही अत्यंत निर्मळ, मनमोकळी आणि कौटुंबिक मूल्यांना जपणारी मुलगी दाखवण्यात आली आहे.
-
चिन्मयीने नुकतेच साडीत मनमोहक अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी चिन्मयीने जांभळ्या रंगाची सुंदर महेश्वरी सिल्क साडी नेसली आहे.
-
या साडीतील लूकवर चिन्मयीने परिधान केलेले मोत्यांचे दागिने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : चिन्मयी साळवी/इन्स्टाग्राम)
‘हिल हिल पोरी हिला’ गाण्यावर शेतकऱ्याच्या पोरीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक