-
अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) आणि सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडी आहे.
-
अभिनय, सूत्रसंचालन आणि नृत्य अशा विविध क्षेत्रांत या दोघांनीही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अभिजीतच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुखदाने सोशल मीडियावर त्यांचे एक रोमँटिक फोटोशूट शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये सुखदा पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे, तर अभिजीतने क्लासिक फॉर्मल कपडे परिधान केले आहेत.
-
हे फोटो शेअर करत सुखदाने अभिजीतला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
३ जुलै रोजी अभिजीतचा मुख्य भूमिका असलेला आणि शौर्य, संघर्ष व न्यायाची कथा मांडणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-
अभिजीत आणि सुखदा १ फेब्रुवारी २०१३ रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या सुखी संसाराला आता १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe: एक दिवसाचा मुख्यमंत्री केलं तर काय कराल? ‘नायक’ सिनेमाच्या प्रश्नावर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर!