-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे सध्या तिच्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ या नव्या वेब सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
-
श्रुतीने केवळ मराठीतच नाही, तर तमीळ, कन्नड व हिंदी चित्रपट, तसेच मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
नुकतेच श्रुतीने सोशल मीडियावर तिचे काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत तिच्या आवडत्या रंगाविषयीही सांगितले आहे.
-
या नवीन फोटोशूटमध्ये श्रुतीने फ्युशिया गुलाबी (Fuchsia Pink) रंगाचा एक अत्यंत सुंदर टॉप परिधान केला आहे.
-
फोटोंमध्ये तिने आपले केस मोकळे सोडले असून, या साध्या टॉप आणि जीन्सच्या लूकमध्येही तिचे सौंदर्य कमालीचे खुलले आहे.
-
या सुंदर आणि आकर्षक फोटोंना तिने ‘My favourite colour Fuchsia Pink’ (माझा आवडता रंग फ्युशिया पिंक) अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिचा हा मनमोहक आणि साधा लूक सोशल मीडियावर येताच चाहत्यांना प्रचंड आवडला असून, त्यावर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करीत असून, तिच्या या मनमोहक रूपाचे आणि साधेपणाचे कौतुक करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
मोठी बातमी: MPSC ऑफलाइन परीक्षेचा वाद चिघळला, आयोग ऐकत नसल्याने आता राज्य सरकारनेच मध्यस्थी करत…