-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा (Prarthana Behere) ‘मर्दिनी’ (Mardini Movie) हा चित्रपट ३ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
-
आजच्या काळातील सामाजिक घडामोडींचा संदर्भ घेऊन लिहिलेली कथा आणि वास्तववादी मांडणी हे या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
-
अजय मयेकर दिग्दर्शित या चित्रपटात ‘सायबर क्राईम’ या गंभीर विषयावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
-
या चित्रपटात प्रार्थनाबरोबरच बालकलाकार मायरा वायकूळ, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
या चित्रपटाच्या प्रदर्शनाबरोबरच सध्या सोशल मीडियावर प्रार्थनाच्या नव्या फोटोशूटची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रार्थनाने जांभळ्या रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली आहे.
-
या साडीवर प्रार्थनाने हलका मेकअप आणि केसांची बन हेअरस्टाईल करत आपला लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
MPSC ऑफलाइन परीक्षेचा वाद चिघळला, आयोग ऐकत नसल्याने आता थेट राज्य सरकार मध्यस्थी करणार; कोणते बदल विचाराधीन?