-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे सध्या त्याच्या गोवा ट्रिपमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
-
सुमीत आणि त्याची पत्नी मोनिका पुसावळे हे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर रोमँटिक वेळ घालवत असून, सुमीतने या ट्रिपचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या खास क्षणी मोनिकाने केशरी रंगाचा लाँग वन पीस परिधान केला होता, तर सुमीत पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये अतिशय देखणा दिसत होता.
-
समुद्रकिनाऱ्यावर खाली बसून सुमीतने मोनिकाचा हात प्रेमाने हातात घेतल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
दोघांनीही डोक्यावर हॅट घालून केलेले हे फोटोशूट चाहत्यांच्या भलतेच पसंतीस पडत असून त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
हे रोमँटिक फोटो शेअर करताना सुमीतने, ‘Falling in love with you a little more in every trip & every movement’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
त्यांच्या या फोटोंवर मालिकेतील मुख्य अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने ‘Preemmm’ अशी केलेली कमेंट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुमीत पुसावळे/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe: एक दिवसाचा मुख्यमंत्री केलं तर काय कराल? ‘नायक’ सिनेमाच्या प्रश्नावर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर!