-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुना येती घरा’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री दीपा चौधरी ही ‘उमावती’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने दीपाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतीच दीपाने सोशल मीडियावर एक अत्यंत भक्तीमय पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये तिने “येळकोट येळकोट जय मल्हार” योगायोग असावा तर असा… जसं सुना येती घरा मालिकेत उमाच्या घरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचं खूप महत्त्व आहे, तसंच दीपाच्या आयुष्यात कुलदैवताच्या रूपात तो सदैव माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि यासाठी मी त्याची सदैव ऋणी आहे, “सदानंदाचा येळकोट” असे कॅप्शन दिले आहे.
-
या पोस्टमधून तिने रील आणि रिअल लाईफमधील एक अद्भूत योगायोग मांडला आहे. मालिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही खंडोबा तिचे कुलदैवत असल्याचे तिने सांगितले.
-
खंडोबा देव नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, अशी कृतज्ञता तिने व्यक्त केली आहे.
-
दीपाच्या या सुंदर पोस्टवर सध्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: दीपा चौधरी/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंचं वक्तव्य; “माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो”