-
अभिनेत्री रिंकू राजगुरु म्हटलं की सैराट चित्रपट आठवतो. या चित्रपटाने तिला घराघरांत प्रसिद्धी दिली.
-
सैराटनंतर रिंकूने कागर या सिनेमातही काम केलं. त्यातल्या तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं आहे. आता रिंकू वारीच्या गाण्यात दिसणार आहे.
-
पंढरीची वारी सुरु झाली आहे. अशातच रिंकूने वारीसाठी एक खास गाणं शूट केलं आहे. यातले तिचे फोटो चर्चेत आले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-PR)
-
राणी कलरची साडी, डोक्यावर पदर घेतलेली रिंकू या लूकमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
-
रिंकूने या गाण्यात चक्क चुलीवर स्वयंपाकही केला आहे.
-
रिंकूचे चाहतेे राज्यभरात आहेत. त्यांच्यासाठी तिचे हे फोटो आणि वारीचं गाणं म्हणजे जणू पर्वणीच.
-
पांढरी साडी आणि काळं ब्लाऊज अशा साध्या लूकमध्येही रिंकूचं सौंदर्य खुलून आलं आहे यात शंकाच नाही.
नागपूर : बेपत्ता कुटुंब पिंपरी चिंचवडमध्ये सुखरूप, ११ दिवसांनंतर बँक व्यवहाराने लागला सुगावा