-
नवीन हिंदी चित्रपट ‘श्री रामभूमी’च्या चित्रीकरणाला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.
-
या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम उत्तर प्रदेशातील पवित्र अयोध्या नगरीत दाखल झाली आहे.
-
बॉलीवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
-
शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अनुपम खेर यांनी अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक श्री राममंदिराला भेट दिली.
-
मंदिरात जाऊन त्यांनी रामलल्लाचे अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतले आणि त्यांच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद घेतले.
-
अनुपम खेर यांनी या अयोध्या दौऱ्याचे काही खास फोटो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये अनुपम खेर खांद्यावर पिवळे उपरणे ओढून मंदिराच्या आवारात हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे.
-
नवीन चित्रपट ‘श्री रामभूमी’ चित्रपटाच्या शूटिंगचा आज अयोध्यामध्ये पहिला दिवस आहे! श्री राममंदिरात जाऊन रामलल्लांचे आशीर्वाद घेतले! स्वतःसाठी, आपल्या कुटुंबीयांसाठी/मित्रांसाठी, चित्रपटासाठी आणि तुम्हा सर्वांसाठीसुद्धा! खूप सुखावह अनुभव होता! देश-विदेशातून आलेल्या हजारो रामभक्तांसोबत ‘जय श्री राम’चा जयघोष केला! ॐ’ अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनुपम खेर/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंचं वक्तव्य; “माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो”