-
बॉलीवूडची आघाडीची व लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या नवनवीन आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रेक्षकांची मने जिंकत असते.
-
नुकतेच जान्हवीच्या बहिणीचे लग्न आणि रिसेप्शन पार पडले असून, या सोहळ्यातील तिच्या खास पारंपरिक लूकचे फोटो समोर आले आहेत.
-
या कौटुंबिक सोहळ्यासाठी जान्हवीने एक अत्यंत सुंदर आणि नक्षीदार अशी जांभळ्या-गुलाबी रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती.
-
या लूकमध्ये जान्हवी अत्यंत देखणी आणि राजेशाही थाटात दिसत असून, तिच्या सौंदर्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.
-
मात्र, या सर्व सुंदर लूव्यतिरिक्त चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते जान्हवीच्या हातावर काढलेल्या एका खास गोष्टीने.
-
या सोहळ्यादरम्यान जान्हवीने तिच्या हातावर एक अतिशय नाजूक आणि सुंदर मेंदीची डिझाईन काढली होती.
-
तिच्या हातावरील या मेंदीमध्ये इंग्रजीत ‘शिखु’, असे लिहिलेले स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा होत आहे.
-
जान्हवीने मेंदीत लिहिलेल्या या नावामुळे सोशल मीडियावर ती तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्या प्रेमात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंचं वक्तव्य; “माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो”