-
प्रसिद्ध नर्तिका राधा पाटील आपल्या उत्कृष्ट नृत्यामुळे महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
-
नुकतीच ती ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातून स्पर्धक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
-
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या राधाने नुकतेच श्री विठ्ठलाच्या दर्शनाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि त्यावर काळ्या-पांढऱ्या नक्षीची शाल परिधान केल्याचे दिसत आहे.
-
कपाळावर लावलेला पिवळा टिळा आणि चेहऱ्यावरील गोड हास्य तिच्या या साध्या लूकला अधिकच खुलवत आहे.
-
विठुरायाच्या मूर्तीजवळ उभे राहून तिने अतिशय भक्तीभावाने हे फोटो काढले आहेत.
-
हे फोटो पोस्ट करताना तिने ‘माझ्या पांडुरंगाची वारी’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
राधाचा हा भक्तीमय अंदाज आणि साधेपणा तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: राधा पाटील/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंचं वक्तव्य; “माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो”