-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विसरू नको तू मला’ (Visaru Nako Tu Mala TV Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले (Tanvi Mundle) मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.
-
श्रावण हा सण, व्रते आणि उत्सवांचा महिना मानला जातो. या श्रावणात मंगळागौरीच्या पूजेला आणि खेळांना विशेष महत्त्व आहे.
-
नुकतीच तन्वी मुंडलेने एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला खास हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यात तन्वीने केलेल्या पारंपरिक मराठमोळ्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
यावेळी तन्वीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा आरी-वर्क ब्लाऊज परिधान केला होता.
-
पारंपरिक नऊवारी साडीबरोबर साजेसे दागिने आणि मोत्याची नथ परिधान करून तन्वीने तिचा हा लूक पूर्ण केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : तन्वी मुंडले/इन्स्टाग्राम)
सकाळी लवकर उठण्यापासून ते सहानुभूती जपण्यापर्यंत… कोंबड्यांकडून माणसांनी शिकावेत असे ५ गुण; चाणक्यांनी सांगितले