-
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली आणि तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या अपूर्वाने नुकतेच तिचे काही नवीन सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या नव्या फोटोंमध्ये अपूर्वाचा अतिशय मनमोहक आणि पारंपरिक मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
-
तिने नेसलेली जांभळ्या रंगाची रेशमी साडी आणि त्याला असलेली गुलाबी-सोनेरी काठ तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
या साडीवर तिने परिधान केलेले पारंपारिक सोन्याचे दागिने, गळ्यातील ठुशी, लांब हार, मंगळसूत्र, नाकात घातलेली नथ, आणि झुमके सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
विशेष म्हणजे हे सुंदर फोटो पोस्ट करताना अपूर्वाने ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन !’ हे प्रसिद्ध गीतेतील श्लोक कॅप्शन म्हणून लिहिले आहे.
-
अपूर्वाचा हा पारंपरिक साडी लूक आणि तिची कॅप्शन सध्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
‘मी आत आले तर तुम्हाला बाहेर जावे लागेल!’ प्रभारी आयुक्त भाग्यश्री विसपुते ‘ॲक्शन मोड’वर..