-
सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
सायलीने आपल्या सहज-सुंदर आणि नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
-
सायलीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे साडीतील सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये सायलीने खास ‘राधा-कृष्ण’ यांची प्रतिमा असलेला सुंदर पदर असलेली गुलाबी पैठणी साडी नेसली आहे.
-
या गुलाबी पैठणीवर सायलीने आकर्षक निळ्या रंगाचा ब्लाऊज आणि मोत्यांचे पारंपारिक दागिने परिधान करून लूक पूर्ण केला आहे.
-
या खास फोटोंना सायलीने “Love For पैठणी” असे कॅप्शन दिले आहे.
-
विशेष म्हणजे सायलीने परिधान केलेली ही साडी अभिनेत्री अक्षया देवधरच्या ‘भरजरी बाय नाम’ या ब्रँडची आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS