-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नवेली नंदा सध्या सोशल मीडियावर तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
जरी तिने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले नसले, तरी तिची लोकप्रियता आणि फॅशन सेन्स नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.
-
प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या ब्रँडच्या ४० वर्षांच्या यशस्वी प्रवासाच्या उत्सवासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खास प्रसंगी अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती, जिथे नव्या नवेली नंदाचा लूक सर्वांत जास्त उठून दिसला.
-
या कार्यक्रमात नव्याने परिधान केलेल्या अत्यंत आकर्षक आणि भरजडीत अशा सोन्याच्या मिनी ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
तिच्या ड्रेसवर नाण्यांचे, मण्यांचे आणि बारीक एम्ब्रॉयडरीचे अप्रतिम काम करण्यात आले असून ते अतिशय रॉयल वाटत आहे.
-
या शॉर्ट स्लीव्हज आणि गळ्याभोवती जड नक्षीकाम असलेल्या ड्रेसमध्ये नव्याची कॉंफिडेंट स्टाइल आणि ग्लॅमरस अंदाज स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
नव्याच्या या रॉयल आणि बोल्ड लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून तिचे हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: नव्या नवेली नंदा/इन्स्टाग्राम)
दीडशे किलो बटाटे, चटणीची खास रेसिपी- चेंबूरच्या नंदू वडापावची गोष्ट!