-
मुंबईत पार पडलेल्या ‘६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ (62nd Maharashtra State Marathi Film Awards) सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
-
या सोहळ्यात राणी मुखर्जीला (Rani Mukerji) २०२५ या वर्षाचा मानाचा ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी राणीने गुलाबी पदर असलेली सुंदर हिरवी साडी परिधान केली होती.
-
हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, कानातले आणि केसात माळलेला गजरा… अशा पारंपरिक मराठी रूपात राणी खूपच खुलून दिसत होती.
-
पुरस्कार स्वीकारल्यानंतर राणीने हिंदी किंवा इंग्रजीऐवजी अस्खलित मराठीतून भाषणाला सुरुवात करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.
-
राणीच्या या खास लूकचे आणि मराठीतील भाषणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : राणी मुखर्जी/इन्स्टाग्राम)
वय वाढलं तरी चालणं-उठणं राहील सोपं, गुडघेदुखीचा त्रास होणार नाही! माधुरीच्या नवऱ्याने सांगितलेले ५ सोपे उपाय करा; ‘ही’ ४ अक्षरे लक्षात ठेवा!