-
प्रसिद्ध अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच आपल्या खास शैलीमुळे चाहत्यांच्या चर्चेत आणि पसंतीत असते.
-
तिच्या निखळ हास्याने आणि उत्तम अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. मिथिलाने नुकतेच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे.
-
गणपतीपुळे येथील सुंदर मंदिराच्या परिसरातील तिचे हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. या मंदिरात दर्शनासाठी आलेली मिथिला अत्यंत प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणात पाहायला मिळत आहे.
-
या खास प्रसंगी मिथिलाने हलक्या गुलाबी रंगाचा अत्यंत सुंदर आणि साधा कुर्ता परिधान केला होता.
-
तिच्या या साध्या, शोभून दिसणाऱ्या ट्रॅडिशनल लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हातामध्ये पूजेचे साहित्य आणि नारळ घेऊन तिने मंदिरासमोर अतिशय गोड पोज दिली आहे.
-
तिने या पोस्टला ‘What a sweet time to reminisce our visit to this beautiful Bappa temple’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
बाप्पाच्या दर्शनाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्यावर लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS