-
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय व अभ्यासू अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने नुकतीच सोशल मीडियावर एक अतिशय खास आणि भावूक पोस्ट शेअर केली आहे.
-
या फोटोंमध्ये तिने तिच्या बालपणीचा एक दुर्मीळ कौटुंबिक फोटो आणि तिचे सद्य:स्थितीतील काही सुंदर फोटो एकत्र पोस्ट केले आहेत.
-
विशेष म्हणजे शिवानीने नुकत्याच काढलेल्या फोटोंमध्ये आपल्या आईची तीच जुनी साडी नेसून, अतिशय सुंदर आणि पारंपरिक लूक साकारला आहे.
-
या हिरव्या व पिवळ्या रंगाच्या साडीवर तिने सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे, जो तिच्या या लूकला आधुनिकता आणि सौंदर्य देतो.
-
आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तिने गळ्यात पारंपरिक सोन्याचा ठुशीसारखा हार, कानात मॅचिंग झुमके आणि कपाळावर छोटी नाजूक टिकली लावली आहे.
-
या सुंदर फोटोंना शिवानीने एक अतिशय भावनिक कॅप्शन दिली आहे. तिने लिहिले आहे, “माझ्या बारशाला आईनी नेसलेली ही साडी काल मी नेसले!! इतकी वर्षं ती आहे तशीच टवटवीत आहे, साडी आणि आई दोन्ही.”
-
आई आणि मुलगी यांच्यातील प्रेमाचे हे अनोखे नाते आणि साडीचे हे भावनिक कनेक्शन पाहून शिवानीच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
सोनिया गांधींचा आरोप अण्णा हजारेंनी फेटाळला, म्हणाले; “जबाबदार व्यक्तीने जबाबदारीने बोललं पाहिजे”