-
अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
-
नुकताच धनश्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पारंपरिक आणि अत्यंत सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
-
या खास फोटोशूटमध्ये धनश्रीने जांभळ्या (Purple) रंगाची सुंदर पैठणी साडी परिधान केली असून, त्यात ती अत्यंत देखणी दिसत आहे.
-
तिने नेसलेल्या साडीवर सोनेरी नक्षीकाम आणि सुरेख काठ असून, त्यासोबत तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या पारंपरिक पेहरावाला साजेसे असे सोन्याचे चोकर हार आणि कानात मॅचिंग झुमके तिने परिधान केले आहेत.
-
नाकात मोत्याची नथ आणि हातात लाल-सोनेरी बांगड्यांमुळे तिच्या या अस्सल मराठमोळ्या लूकला एक वेगळाच रुबाब प्राप्त झाला आहे.
-
निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूच्या पार्श्वभूमीवर काढलेले हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून, या लूकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: धनश्री काडगावकर/इन्स्टाग्राम)
गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीच्या राजेश पाटील यांची निवड झाल्याची धनंजय महाडीक यांची घोषणा, नेमकं काय म्हणाले?