-
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अंकिता लोखंडेने बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती नेहमीच तिचे नवनवीन आणि आकर्षक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
नुकतेच तिने केलेल्या एका खास फोटोशूटमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी परिधान करून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
-
या फोटोशूटसाठी अंकिताने पांढऱ्या अन् सोनेरी रंगाची आणि जरीची किनार असलेली अत्यंत सुंदर नऊवारी साडी नेसली आहे.
-
तिच्या या पारंपारिक लूकला पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात सोन्याचा ठुशी आणि कोल्हापुरी साज, कानात झुमके तसेच बुगडी घातली आहे.
-
नाकात नाजूक पारंपरिक मोत्याची नथ आणि कमरेला सोन्याचा कंबरपट्टा बांधून तिने तिचे सौंदर्य आणखी खुलवले आहे.
-
कपाळावर चंद्रकोर आणि नऊवारीतील मनमोहक अदांमुळे अंकिताचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्: अंकिता लोखंडे/इन्स्टाग्राम)
नोव्हेंबरमध्ये मंगळ-गुरू-केतूची धोकादायक युती; दिवाळीनंतर ‘या’ ४ राशींच्या व्यक्तींवर येणार मोठे संकट? बिघडणार बजेट आणि आरोग्य