-
मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख ही तिच्या अभिनयासोबतच खास फॅशन सेन्स आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच अमृताने सोशल मीडियावर तिचे काही अत्यंत आकर्षक आणि सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये अमृताने हिरव्या रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला अत्यंत सुंदर असा एथनिक आऊटफिट परिधान केल्याचे दिसत आहे.
-
तिने या परिधानावर सोनेरी व पिवळसर रंगाची शेड असलेली ओढणी अतिशय नजाकतीने घेतल्याचे दिसून येत आहे.
-
या आऊटफिटला साजेसे असे पारंपरिक झुमके आणि हातात नाजूक ब्रेसलेट परिधान करून, तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
तिने या खास फोटोशूटला सोशल मीडियावर पोस्ट ‘Green Forest Vibe’, अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांकडून तिच्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव