-
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा ‘अडकित्ता’ हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी ‘झी ५’(ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सईने अत्यंत महत्त्वाची असलेली ‘मंगल’ नावाची व्यक्तीरेखा अत्यंत सुंदरपणे साकारली आहे.
-
सईने नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.
-
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती हिरव्यागार निसर्गरम्य आणि नयनरम्य पार्श्वभूमीवर उभी असलेली दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये तिने फिकट निळ्या रंगाची गुलाबी फुलांची नक्षी असलेली सुंदर साडी परिधान केली आहे.
-
केसांची साधी वेणी, कपाळावर छोटी लाल टिकली आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य तिचा लूक अधिक खुलवते.
-
सईने या फोटोंना ‘मंगल. (Somewhere in between me and her)’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
पादण्याचा घाणेरडा वास, भयंकर गॅस म्हणजे आतड्यांत कुजलंय अन्न; फक्त चिमुटभर चावून खा ‘हा’ पदार्थ, लगेच व्हाल मोकळे