-
मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
गिरिजा ओक हिने नुकतीच अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूयॉर्क शहराला भेट दिली असून तिथे ती सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
-
या खास ट्रिपदरम्यान तिने न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘ब्रुक्लिन ब्रिज’ (Brooklyn Bridge) वर उभे राहून आकर्षक पोज देत फोटो काढला आहे.
-
तसेच तिने पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ (Statue of Liberty) जवळ जाऊन सुंदर सेल्फी घेतला आहे.
-
न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक आणि भव्य अशा ‘ग्रँड सेंट्रल टर्मिनल’ (Grand Central Terminal)लासुद्धा तिने भेट दिली आहे.
-
या पर्यटनादरम्यान तिच्यासोबत तिचा मुलगादेखील उपस्थित असून ते एकत्र क्वालिटी टाईम घालवत आहेत.
-
तिच्या लूकबद्दल बोलायचे तर तिने निळ्या रंगाचा शर्ट, डेनिम जीन्स, गॉगल आणि खांद्यावर बॅग असा अतिशय कम्फर्टेबल व कॅज्युअल ट्रॅव्हल लूक केला आहे.
-
दुसऱ्या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या लांब कुर्त्यामध्ये अत्यंत साध्या, नैसर्गिक आणि सुंदर रूपात पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: गिरिजा ओक/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव