-
‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली आणि प्रेक्षकांची आवडती ठरलेली लोकप्रिय अभिनेत्री अनुश्री माने हिने तिचा वाढदिवस उत्साहात साजरा केला आहे.
-
अनुश्रीने नुकताच तिचा २३ वा वाढदिवस अत्यंत आनंदात आणि कौटुंबिक वातावरणात साजरा केला.
-
वाढदिवसाच्या या खास प्रसंगी अनुश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर आणि खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
तिने या सेलिब्रेशनसाठी निळ्या रंगाची साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करून सुरेख लूक केला आहे.
-
या खास क्षणी तिची आई तिच्याबरोबर उपस्थित असून, आईबरोबरचे तिचे अत्यंत गोड आणि आपुलकीचे बंध या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहेत.
-
हे फोटो पोस्ट करताना अनुश्रीने ‘Chapter 23 begins… Grateful for how far I’ve come, excited for everything ahead’ अशी कॅप्शन दिली आहे .
-
अनुश्रीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनुश्री माने/इन्स्टाग्राम)
मराठमोळे महेश भागवत हैदराबादचे पोलीस आयुक्त, विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिली खास पोस्ट