-
अभिनेत्री रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनय आणि सौंदर्याची जादू दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
नुकतेच तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही अत्यंत सुंदर आणि पारंपरिक लूकचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने परिधान केलेली लाल आणि नारिंगी रंगाच्या चेक्स डिझाईन असलेली साडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या साडीबरोबर तिने ऑफ-व्हाईट रंगाचा क्लासिक पफ स्लीव्हज ब्लाऊज घातला असून, त्यामुळे तिचा लूक खूपच खास दिसत आहे.
-
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका नेहमीच तिच्या नवनवीन आणि हटके लूकने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
-
तिने गळ्यात आकर्षक सोन्याचा हार, कानात मॅचिंग झुमके आणि कपाळावर छोटी लाल टिकली लावून आपला पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
-
तिच्या या साडीतील अस्सल देशी आणि सोज्वळ लूकवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)
मोबाईलच्या आहारी गेलेल्या समाजाची विचारशक्ती हरवत चाललीय; उद्धव ठाकरे यांची खंत