-
महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra).
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली आहेत.
-
विविध व्यक्तिरेखा, भन्नाट स्किट्स, कलाकारांची अफलातून केमिस्ट्री आणि रोजच्या आयुष्यातील प्रसंग विनोदी अंदाजात मांडण्याची शैली, यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून नेहमीच भरभरून प्रेम मिळाले आहे.
-
या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
प्रियदर्शिनीने नुकतेच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी केलेल्या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यावेळी प्रियदर्शिनीने फिकट गुलाबी रंगाचा सुंदर वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
प्रियदर्शिनीने या फोटोंना “Channelising My Inner Pinki Bhabi” असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”